Phone : 02162-238713, 9637077152

Various dental health problems as well as treatment and prevention

Home   >   Blogs


Various dental health problems as well as treatment and prevention

बालवयापासून ते वृद्धापकाळ इतक्या दीर्घ कालावधीसाठी दैनंदिन कार्य करणारे दात विविध समस्यांचा सामना करत असतात. परंतु ह्या समस्या एकतर पूर्णपणे टाळता येतात अथवा वेळीच उपचार करून सोडवताही येतात. आता अत्याधुनिक उपचार करून गमावलेल्या दातांना त्यासारख्या मजबुतीचा रोपण केलेला दात पण लावता येतो. तर सामान्यत: आढळणाऱ्या दंतरोग तसेच त्यांच्या उपचाराविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ.

 

*दात किडणे*: दात कीडल्यास त्याच्या प्राथमिक अवस्थेत कीड काढून विविध फिलिंग्ज करता येतात. ह्यात प्रामुख्याने चांदी भरणे तसेच दातांच्याच रंगाच्या काही पदार्थांचा समावेश होतो. वेळीच निदान झाल्यास एकाच व्हिजीट मध्ये अनेक दातांची कीड काढून फिलींग्ज करून दात पूर्ववत करता येतात. कीड जर दातात खोलवर पसरून मुळांशी जंतुसंसर्ग झाला तर तीव्र वेदना होतात आणि उपचारही जास्त वेळेचा व जास्त खर्चाचा होतो. अश्या वेळेस बहुतांश दात हे रूट कॅनाल ट्रिटमेंट करून वाचवता येतात आणि त्या दातांवर क्राऊन/कॅप बसवून दात पूर्ववत वापरात आणता येतो. ह्या उपचाराला वेळ अधिक लागतो तसेच खर्चही जास्त येतो. जर असे उपचार करूनही दात वाचण्याच्या टप्प्यापलिकडे गेलेला असेल तर दात काढून टाकण्याशिवाय पर्याय उरत नाही. अश्यात, काढलेला दात पुन्हा बसवून घेणेही गरजेचे असते. कृत्रिम दात बसवण्याच्या अत्याधुनिक पध्यती उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने डेंटल ब्रीज करणे आणि इम्पलांट करणे ह्याचं समावेश होतो. ब्रीज हा नैसर्गिक दातांच्या आधारे बसवला जातो तर इम्पलांट सरळ हाडात रोपण करून बसवला जातो. पेशंटच्या तोंडातील स्थिती तसेच आवश्यक खर्चाच्या परवानगीने कृत्रिम दात बसवण्याच्या पद्धतीत निवड करता येते. करिता , आपल्या समस्येविषयी डॉक्टरांना बोलून चर्चा करून आपल्याशी सुसंगत असा उपचार निवडावा.

 

परंतु बहुतांश समस्या टाळता येणाऱ्या आहेत , म्हणून वर्षातून एकदा तरी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे व निरोगी राहावे

Top